नाशिक: आयुर्वेद रुग्णालयात चोरी करणारे तिघे अटकेत !

नाशिक। दि. २० जुलै २०२५: पंचवटी येथील आयुर्वेद रुग्णालयाच्या औषध भांडार विभागातून अ‍ॅल्युमिनियमचे झाकण चोरणाऱ्या तीन संशयितांना २४ तासांच्या आत अटक करण्यात आली. मयूर जाधव (रा. हिरावाडी), जितेश उर्फ गुड्डू फसाळे, संदीप कनोजिया (रा. गणेशवाडी) अशी संशयितांची नावे आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची ₹१४.६४ लाखांची सायबर फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित हिरावाडी येथे असल्याची माहिती डीबी पथकाचे कुणाल पचलोरे यांना मिळाली. पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, संपत जाधव, महेश नांदुर्डीकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790