
नाशिक (प्रतिनिधी): कमरेला चॉपर लावून फिरणाऱ्या युवकास गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने मटाले चौक, सिडको येथून ताब्यात घेतले आहे.
शनिवारी (दि. १५ मार्च २०२५) युनिट १ चे पथक गस्त घालत असतांना पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांना माहिती मिळाली की, मटाले चौक, सिडको येथे एक युवक पॅन्टच्या आतील बाजूस चॉपर लावून फिरत आहे. पथकाने सापळा लावून संशयित उमेश सुनील माळी (वय: १९, राहणार: कामटवाडा, नाशिक) याला तात्काळ ताब्यात घेतले. त्याच्याकडून चॉपर जप्त करण्यात आले असून त्याला पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, पोलिस हवालदार: प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, रमेश कोळी, विशाल काठे, पोलीस अंमलदार: मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, सुकाम पवार यांनी केलेली आहे.