नाशिक: तडीपार सराईत धारदार शस्त्रासह खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात !

नाशिक। दि. ११ सप्टेंबर २०२५: शहर व जिल्ह्यातून २२ महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलेल्या सराईतास म्हसरूळ पोलिसांनी धारदार शस्त्रासह रिक्षातून ताब्यात घेतले. त्याच्यावर म्हसरूळ पोलिस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. नाशिक शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पूजा आंबेकर खूनप्रकरणी दीराला फाशीची शिक्षा; ३५ वार करून केली होती हत्या

याबाबत पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर आणि राऊत यांना माहिती मिळाली होती की, सराईत रिंकेश गणेश सोलंकी (२५, रिक्षाचालक, रा. बेलदारवाडी, म्हसरुळ) हा बोरगड परिसरातील मोकळ्या भूखंडावर येणार आहे. त्यानुसार सापळा रचला असता ए, टी. पवार शाळेच्या बाजूला असलेल्या मैदानावर रिंकेश सोलंकी रात्री ८ वाजेच्या सुमारास रिक्षात धारदार कोयता बाळगून वावरताना आढळून आला. त्याला शस्त्रासह अटक करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर १९ व २० सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन; नाव नोंदणीची संधी

सदरची कामगीरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, दिलीप भोई, मंगला जगताप, योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, मंगेश जगझाप, पोलीस नाईक भुषण सोनवणे, चारूदत्त निकम, भरत राऊत, भगवान जाधव व सविता कदम यांच्या पथकाने केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790