नाशिक: मालकानेच रचला ट्रक चाेरीचा बनाव; १२ लाखाचे भंगार परस्पर विकून ट्रकची लावली विल्हेवाट

नाशिक (प्रतिनिधी): भंगाराच्या मालाने भरलेला ट्रक चोरी झाल्याचा बनाव करत त्याची परस्पर विल्हेवाट लावून भंगार विक्री केल्याची घटना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने उघडकीस आणली आहे. ट्रकमालकाच्या संगनमताने ट्रकचालकाने हा गुन्हा दाखल केल्याचे उघडकीस आले आहे. संशयित दोघांसह ट्रकचालक साेनू उर्फ फरहान यास मुंबईनाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

वडाळानाका येथील सर्व्हिस रोड भागातून ३ एप्रिलला रात्री १०.३० वाजता ट्रक चोरीस गेल्याची फिर्याद मुंबईनाका पोलिस ठाण्यात दाखल आहे. चोरीस गेलेल्या ट्रकमध्ये १२ लाख रुपयांचे भंगार साहित्य होते. तपास करताना युनिट एकचे श्रेणी उपनिरीक्षक रवींद्र बागुल व हवालदार विशाल काठे यांना मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकमालकानेच चालकासोबत संगनमत करून चोरीचा बनाव केल्याचे समजले. त्यासाठी इतरांनी मदत केली. दरम्यान, या गुन्ह्यातील दोन संशयित राजस्थान येथून मालेगावच्या दिशेने येत असल्याची माहिती पथकास कळाली.

🔎 हे वाचलं का?:  राष्ट्रीय मतदार दिवस: राज्यस्तरीय कार्यक्रमानिमित्त नाशिकला आज (दि. २५) विविध कार्यक्रम

त्यानुसार युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचण्यात आला.

दरम्यान, ट्रकचालक सोनु उर्फ फरहान याच्या मदतीने संशयितांनी ट्रक सुद्धा स्क्रॅप केला. त्यानंतर ट्रकच्या स्क्रॅपसह ट्रकमधील भंगार माल जालना येथील भाग्यलक्ष्मी कंपनीत विक्री केल्याचे सालीम याने सांगितले. त्यामोबदल्यात मिळालेल्या ७ लाख रुपयांपैकी ३ लाख रुपये सालीम शेख यास मिळाले. गुन्हे शाखेच्या पथकाने ते पैसे जप्त केले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चोरीच्या पाच मोटारसायकलींसह आरोपी अटकेत; पाच गुन्हे उघडकीस

हवालदार काठे, प्रशांत मरकड, प्रविण वाघमारे, संदिप भांड, प्रदिप म्हसदे, नाझीमखान पठाण, नाईक विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी व अमोल कोष्टी यांनी धुळे जवळील लळिंग टोलनाका येथून खासगी बसमधून ताब्यात घेतले. त्यात सालीम रशीद शेख (१८, रा. द्वारका) व नाविद आरीफ शेख (२१, रा. साठेनगर, वडाळा) यांना ताब्यात घेत चौकशी केली असता ट्रकमालक साहिल हनिफ शेख (२७, कथडा) याच्या सांगण्यावरून ट्रक चोरीचा बनाव करीत भंगार साहित्य विक्री केल्याची कबुली दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790