नाशिक: बसस्थानकातून महिलांचे दागिने लंपास

नाशिक। दि. २४ एप्रिल २०२६: द्वारका परिसरातील अंडरपास रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या बस सेवा सध्या निमाणी बस स्थानकातून चालवल्या जात आहेत. या बदलामुळे स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली असून, याच गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेषतः वयोवृद्ध महिलांना लक्ष्य केले जात असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

अशाच प्रकारातील एक घटना दोन दिवसांपूर्वी घडली असून, ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचे मणीमंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी गंगापूर रोड परिसरातील हौसाबाई कौतिक आहेर (वय ७५) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

तक्रारीनुसार, आहेर या निमाणी बस स्थानकात बसमधून उतरून कळवणकडे जाणाऱ्या दुसऱ्या बसमध्ये चढत असताना गर्दीच्या गोंधळात त्यांच्या तसेच अलका काशिनाथ गांगुर्डे यांच्या गळ्यातील मणीमंगळसूत्र चोरीला गेले.

निमाणी बस स्थानकात सध्या मोठ्या प्रमाणावर वर्दळ असून, बसमध्ये चढताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत भुरट्या चोरांकडून दागिने लंपास करण्याच्या घटना वाढत आहेत. विशेषतः वयोवृद्ध महिलांना लक्ष्य केले जात असल्याने प्रवाशांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790