
नाशिक। दि. ४ ऑक्टोबर २०२५: नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्ववभूमीवर नाशिक शहर पोलिसांनी तब्बल २२४ टवाळखोरांवर कारवाई केली आहे.
पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली व सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके, सहायाक पोलीस आयुक्त (नाशिकरोड विभाग) सचिन बारी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा अंतर्गत येणारे १) मध्यवर्ती गुन्हे शाखा, २) गुन्हे शाखा, युनिट-१, ३) गुन्हे शाखा, युनिट-२, ४) गुंडा पथक ५) सायबर पोलिस स्टेशन ६) विशेष शाखा ७) अंमली पदार्थ विरोधी पथक, ८) पोलीस कल्याण शाखा, ९) महिला सुरक्षा पथक, १०) तक्रार निवारण पथक, ११) नाशिकरोड पोलिस स्टेशन चे गुन्हे शोध पथक व १२) उपनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक असे प्रत्येक शाखांचे ०१ अधिकारी व १० अंमलदार तसेच त्याचे वाहन अशांनी संपूर्ण नाशिकरोड व उपनगर पोलीस स्टेशनचे हद्यीत १८.३० ते २३.०० वा. दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली.
यात रस्त्यावर दारू पिणारे, टवाळखोर, ट्रिपल सीट वाहन चालविणारे, मोकळे मैदाने यामध्ये बसून दारू पिणारे असे एकूण २२४ इसम यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलिस स्टेशनला आणून त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ८५ (१) प्रमाणे २२ इसमांवर गुन्हे दाखल करून, उर्वरीत टवाळखोर इसमांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११२/११७ प्रमाणे २०२ इसमांवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रमाणे नाशिक शहरातील सर्व पोलीस स्टेशन हद्यीत अचानक कोंबीग ऑपरेशन राबवून टवाळखोरांवर कारवाई करण्यात येणार आहे.
![]()


