नाशिक: नंबर ब्लॉक केल्याचा राग; युवतीला जबर मारहाण; हल्लेखोराला अटक !

नाशिक | दि. २ नोव्हेंबर २०२५: अबोला धरल्याचा राग मनात ठेवून एका तरुणाने परिचित युवतीवर निर्घृण हल्ला केल्याची धक्कादायक घटना द्वारका परिसरात घडली. पीडितेला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून तपोवनातील निर्जन भागात नेऊन बेदम मारहाण करत तिचे डोके दगडावर आपटल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित युवकाला अटक केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  सलग चार दिवस बँका बंद राहणार का ? जाणून घ्या सविस्तर…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती शुक्रवारी (दि. ३१ ऑक्टोबर) महाविद्यालयातून सुटून द्वारका परिसरात आली होती. तेथे बसची प्रतीक्षा करत असताना संशयित आरोपी सिद्धार्थ बर्वे (२५, रा. नाशिक) हा दुचाकीवर (एमएच १५ एचओ ८५२०) आला. त्याने युवतीला “तू माझ्याशी का बोलत नाहीस? माझा नंबर का ब्लॉक केलास?” असे विचारत शिवीगाळ केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: युवकाच्या खूनप्रकरणी महिलेसह चौघांना जन्मठेप !

यानंतर त्याने तिचे केस ओढत जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि तपोवन परिसरात नेले. साधूग्रामजवळील बस डेपोच्या मागील मैदानात त्याने पीडितेला पुन्हा मारहाण करत डोक्यावर दगड आपटला. बचावासाठी पीडितेने प्रतिकार केला असता, ती बेशुद्ध पडली. त्यानंतर आरोपी तेथून दुचाकीवरून पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पीडितेला रुग्णालयात दाखल केले. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी मारहाण आणि विनयभंगाच्या कलमांखाली गुन्हा (क्रमांक ३७१/२०२५) दाखल केला आहे. पुढील तपास आडगाव पोलीस करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790