नाशिक: उड्डाणपूलावर कार अपघातात चालकाचा मृत्यू

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): ओमसाई पेट्रोल पंप परिसरातील उड्डाणपूलावर कार अपघातात चालकाचा मृत्यू झाला. राजेंद्र कट्टरसिंग बागुल (५२ रा. देवळाली कॅम्प) असे मृत कार चालकाचे नाव आहे. याबाबत आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

👉 हे ही वाचा:  आपत्कालीन स्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या 'या' सूचना…

बागुल सोमवारी पिंपळगावकडून नाशिकच्या दिशेने आपल्या चारचाकीतून प्रवास करीत असतांना ओमसाई पेट्रोल पंप परिसरातील आडगाव ब्रिजवर कारचा अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.

👉 हे ही वाचा:  नाशिक: आजपासून तीन दिवस पावसाचा अंदाज !

जखमी अवस्थेत त्यांना नजीकच्या अपोलो हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. गुरूवारी (दि.१४) उपचार सुरू असतांना डॉ. अतुल सांगळे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790