नाशिक (प्रतिनिधी): जयभवानी रोडवरील लोणकर मळा भागातील मुख्य रस्त्यावर शनिवारी (दि. २) मध्यरात्री बिबट्याचा मुक्त संचार सुरू होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा बिबट्या कैद झाल्याने परिसरातील रहिवासी भयभीत झाले आहेत. वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शनिवारी मध्यरात्री २.४५ वाजता लोणकर मळा, मुख्य रस्ता येथे कुत्र्यांचा जोरदार भुंकण्याचा आवाज आल्याने काही राहिवासी जागे झाले, त्यांनी बाहेर डोकावून पाहिले असता फर्नांडीसवाडीकडून आत लोणकर मळ्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार सुरु होता.
पाच, दहा मिनिटांनंतर बिबट्या पुन्हा माघारी फिरला. मात्र जाताना बिबट्या काही कुत्र्यांच्या दिशेने धावला. मात्र त्याच्या हातून शिकार निसटली. हा सर्व प्रकार रहिवासी संदीप लोणकर यांच्या बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते अॅड. नितीन पंडित यांनी याबाबत वन विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला.
48 Total Views , 1 Views Today