नाशिक पोलिसांच्या वाहनाला धडकून संशयित चोराचा मृत्यू; एटीएम फोडून पळताना घडली घटना

नाशिक (प्रतिनिधी): शहरात चोर पोलिसांच्या पाठशिवणीच्या खेळात संशयित चोराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. म्हसरूळ परिसरात पहाटेच्या सुमाराला एटीएम मशीन फोडून चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या संशयितांचा पाठलाग करताना गुन्हा शोध पथकाच्या पोलिस वाहनाला एक संशयित धडकला. संशयित गंभीर जखमी झाल्याने उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.

नाशिक शहरातील म्हसरुळ परिसरात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमाराला ही घटना घडली. या परिसरात तीन ते चार संशयितांनी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न अयशस्वी झाल्याने संशयितांनी किशोर सूर्यवंशी मार्गावर असलेल्या एका बँकेच्या एटीएमकडे मोर्चा वळविला.

याचवेळी संशयित एटीएम फोडत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच म्हसरूळ पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी, सीआर मोबाईल व गुन्हा शोध पथकाचे पोलिस कर्मचारी किशोर सूर्यवंशी मार्गाच्या दिशेने पोलिस सायरन वाजवत रवाना झाले. किशोर सूर्यवंशी मार्गावर एटीएम फोडण्याचा तयारीत असलेल्या संशयितांना पोलिस वाहनाच्या आवाज आल्याने त्यांनी अंधाराच्या दिशेने पळ काढला.

👉 हे ही वाचा:  नाशिक: सोमवारी (दि. १४) विभागीय लोकशाही व महिला लोकशाही दिनाचे आयोजन

दरम्यान एक संशयित रस्त्याच्या डाव्या बाजूला पळत असताना थेट गुन्हे शोध पथकाच्या वाहनाला धडकला. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला म्हसरूळ पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

अपघाताची घटना घडल्यानंतर पोलीस जखमी संशयितास रुग्णालयात नेण्याची धावपळ करीत असताना त्याचे इतर साथीदार मात्र पसार झाले.

नक्की काय घडलं:
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शांतीनगर, मखमलाबाद येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन, क्लासिक मोटार वॉशिंग सेंटर येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन आणि मखमलाबाद येथील युनियन बँकेचे एटीएम मशीन फोडून त्यातील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पोलिस असल्याची बतावणी करत वृद्धेचे ३.७० लाखांचे दागिने लांबवले

गुन्हा घडत असतांना त्याठिकाणी म्हसरूळ पोलीस स्टेशनची गाडी सायरन वाजवत आली. त्यामुळे संशयित आरोपी मिळेल त्या दिशेने पळून गेले. यावेळी एक संशयित आरोपी अचानक पोलिसांच्या गाडीला धडकला. त्याला लागलीच पोलिसांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला.

या घटनेचा तपस नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी तात्काळ गुन्हे शाखेकडे वर्ग केला. घटनास्थळावरून पळून जाणाऱ्या संशयित आरोपींची माहिती घेत असतांना मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी वीरेंद्रकुमार फुलकरण चौधरी (वय: ३३, राहणार: तेजस अपार्टमेंट, म्हसरूळ, मूळ: उत्तर प्रदेश), धर्मेंद्र उर्फ राहुल रामनारायण पाल (वय: ३३, मूळ: उत्तर प्रदेश), अमरकुमार रामदयाल चौधरी (वय: २८, मूळ राहणार: उत्तर प्रदेश) यांना ताब्यात घेतले.

👉 हे ही वाचा:  नाशिक: रिक्षाचालकाचा 3 प्रवाशांवर प्राणघातक हल्ला; गुन्हा दाखल

ताब्यात घेतलेल्या इसमांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे साथीदार अनिल उर्फ धुपकरण चौधरी आणि प्रशांत उर्फ छोटू पाठक यांच्यासोबत केल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्याच्या तपासात त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल, चार राउंड आणि कोयता हस्तगत करण्यात आला आहे.

तसेच या तपासामध्ये सादर घटनेत पोलिसांनी पाठलाग करतांना पोलिसांच्या गाडीला धडकून गुन्हा करून पळून जातांना जो इसम मयत झाला आहे त्याचे नाव प्रशांत वर्ग छोटू पाठक आहे. त्याचप्रमाणे त्याचा मुख्य साथीदार अनिल चौधरी हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790