LPG

नाशिक: भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत २० वर्षीय दुचाकीस्वार ठार

नाशिक (प्रतिनिधी): भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत २० वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात नांदूरनाका ते तपोवन दरम्यानच्या सेलीब्रेशन लॉन्स भागात झाला होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गोडाऊनमधील ४.५ लाखांच्या वायर चोरीचा उलगडा; दोघे जेरबंद !

किरण प्रकाश गायकवाड (रा.रामटेकडी तपोवन) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. गायकवाड गेल्या शनिवारी (दि.८) रात्री नांदूरनाक्याकडून तपोवनच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. सेलीब्रेशन लॉन्स परिसरात अज्ञात चारचाकीने दुचाकीस धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता.

🔎 हे वाचलं का?:  कुंभमेळा २०२७: नाशिक रिंगरोडच्या ३ हजार ९५४ कोटींच्या नागरी कामांना प्रशासकीय मान्यता

बेशुध्द अवस्थेत कुटूबियांनी त्यास तात्काळ आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले होते. गुरूवारी (दि.१३) उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार जाधव करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790