नाशिक। दि. २८ नोव्हेंबर २०२५: सातपूर-त्र्यंबकरोडवरील पपया नर्सरीसमोरील कमानीजवळ भरधाव कंटेनरने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत महिला जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि. २७) सकाळी ११.४० वाजता घडली.
गेल्या तीन दिवसांत हा दुसरा बळी असल्याने या घटनेनंतर परिसरातील रस्त्यांलगतच्या बेशिस्त कंटेनर सातपूरकरांनी पार्किंगसह वर्दळीच्या रस्त्यांवर दिवसा सुरू असलेल्या अवजड वाहतुकीला जोरदार विरोध केला.
सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्र्यंबकरोडवरील पपया नर्सरी येथील सिग्नलवर गुजरातहून आलेला कंटेनर (जीजे ०६ बीटी ०२७१) थांबला. यावेळी स्वाती संतोष बेल्हेकर (४८, रा. त्र्यंबकेश्वर) या आपल्या मोपेड दुचाकीने (एमएच १५ केडी ९३७२) कंटेनरजवळ थांबल्या.
सिग्नल सुटताच दोन्ही वाहने नाशिकच्या दिशेने निघाली. मात्र, कंटेनरचालकाने भरधाव वेगाने येत दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यात बेल्हेकर या कंटेनरच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाल्या. याप्रकरणी सातपूर पोलीस स्टेशनला कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ४४५/२०२५)
![]()


