नाशिक (प्रतिनिधी): मखमलाबाद म्हसरूळ लिंकरोडवर अॅटोरिक्षाला ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव दुचाकी घसरल्याने २० वर्षीय तरूण ठार झाला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अभिषेक माणिक पांडव (२० रा. सिध्दार्थनगर राजवाडा,मखमलाबाद) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
पांडव गेल्या सोमवारी दुपारच्या सुमारास मखमलाबाद म्हसरूळ लिंकरोडने एमएच १५ जीके २६४७ या अॅक्टीव्हा दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. रूग्ठा शॉपिंग मॉल भागात पुढे जाणा-या अॅटोरिक्षास ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव दुचाकी घसरली.
या अपघातात अभिषेक गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत हवालदार संजय गवारे यांनी फिर्याद दाखल केली असून अधिक तपास हवालदार भोज करीत आहेत.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790