नाशिक: भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने दुचाकीस्वार ठार

नाशिक (प्रतिनिधी): महामार्गावरील समृध्दी हॉस्पिटल भागात भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने दुचाकीस्वार ठार झाला. देविदास तुळशीराम निंबोरे (३० रा. मानूर ता.जि. नशिक) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे समाधान समारोह २०२६ चे आयोजन

निबोंरे गुरूवारी (दि.२१) नाशिककडून अपल्या घराकडे दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. महामार्गावरून ते भरधाव जात असतांना समृध्दी हॉस्पिटल परिसरात दुचाकीवरील ताबा सुटल्याने ही घटना घडली. भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने निंबोरे गंभीर जखमी झाले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

🔎 हे वाचलं का?:  मान्सून लांबला? नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद

याबाबत अंमलदार योगेश घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस दप्तरी अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक बनकर करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790