नाशिक: भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ३७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): पेठेनगर परिसरातील चार्वाक चौक भागात भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ३७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक तहसील कार्यालयातर्फे जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव

हनुमंत महादेव गोडसे (रा.पेमगिरी ता.संगमनेर अ.नगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गोडसे गेल्या शनिवारी (दि.१३) पेठेनगर येथील चार्वाक चौक भागातून रस्त्याने पायी जात असतांना हा अपघात झाला होता. पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात दुचाकीने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. रूग्णालयात उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: किरकोळ वादातून कुऱ्हाडीने हल्ला; आरोपीला ७ वर्षांची सक्तमजुरी

याबाबत अंमलदार शिर्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790