नाशिक: भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. हा अपघात नाशिक पुणे मार्गावरील सेंट झेविअर शाळा भागात झाला. सदर वृध्द रस्ता ओलांडत होते.. ट्रकचालक आपल्या वाहनासह पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  राष्ट्रीय मतदार दिवस: राज्यस्तरीय कार्यक्रमानिमित्त नाशिकला आज (दि. २५) विविध कार्यक्रम

शांताराम देवराम चंद्रमोरे (रा.जगतापमळा,तरण तलावाजवळ) असे ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. चंद्रमोरे हे शुक्रवारी (दि.७) सायंकाळच्या सुमारास सेंट झेविअर शाळेसमोर रस्ता ओलांडत असतांना हा अपघात झाला. नाशिकरोडकडून द्वारकाच्या दिशेने भरधाव जाणाºया अज्ञात मालट्रकने त्यांना धडक दिली.

या अपघातात त्यांच्या पोटावरून ट्रकचे चाक गेल्याने चंद्रमोरे गंभीर जखमी झाले होते. मुलगा विश्वास चंद्रमोरे यांनी त्यांना तातडीने बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक होलगीर करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790