नाशिकचे तापमान ३६ अंशांवर; पुढील ४ दिवस होणार लाही लाही

नाशिक (प्रतिनिधी): शहरात शनिवारी (दि. ८) ३६.७ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. आगामी चार दिवस हवामान कोरडे असल्याने नाशिक, धुळे या जिल्ह्यात उष्णतेची लाट रहाणार आहे. ८ ते ११ मार्चदरम्यान राज्यासह नाशिकमध्ये उन्हाची तीव्रता अधिक जाणवणार आहे.

सध्या सकाळी ९ वाजेपासुन ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता असेल असा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. राज्यात आगामी चार ते पाच दिवस आकाश कोरडे आणि निरभ्र राहणार आहे. त्यामुळे कमाल तापमानात वाढ होत आहे. त्याचप्रमाणे नाशिक आणि धुळे येथे ११ मार्चला उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळा तसेच आयएमडी (इंडियन मेटेरॉलॉजिकल डिपार्टमेंट) ने वर्तवला असून यलो अलर्ट जाहीर केला आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' लोकप्रिय मिसळ पॉइंट्स व हॉटेलवर FDA ची धडक कारवाई !
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790