नाशिक: १२ केंद्रांवर ४,३८3 विद्यार्थ्यांची आज सीईटी परीक्षा

नाशिक। दि. ११ मे २०२६: तंत्रशिक्षण आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्त्वाची मानली जाणारी ‘सीईटी’ परीक्षा सोमवारी (दि. ११) पार पडणार आहे. नाशिकमधील एकूण १२ केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, ४३८३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

दोन सत्रांत परीक्षा होत असून शहरात पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, के. के. वाघ, शासकीय तंत्रनिकेतन आणि सपकाळ नॉलेज हब येथे केंद्र आहेत. पुणे विद्यार्थी गृह येथील केंद्रावर सर्वाधिक १,०८७ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था असेल. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर सर्व केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था आणि तांत्रिक तयारी पूर्ण झाली असून सकाळच्या सत्रासाठी विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेपूर्वी केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

या केंद्रांवर होणार परीक्षा:
बी. जी. एस. पायोनिअर्स अकॅडमी, की वर्ड सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रा. लि., के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, गुरु गोविंद सिंग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, एस.एन.जे.बी.के.बी. जे. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मौलाना मुख्तार अहमद नदवी टेक्निकल कॅम्पस, पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, एस.एन.डी. कॉलेज, शासकीय तंत्रनिकेतन, अॅड. ठाकरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, के. आर. सपकाळ कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, सपकाळ इंजिनिअरिंग कॉलेज

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790