नाशिक (प्रतिनिधी) : अनलॉक 4.0 मध्ये यापूर्वीच्या काही नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. यात ई-पास रद्द करणे ही महत्वाची घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे आता कोणत्याही अटीशिवाय आणि ई-पास शिवाय एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाने लॉज आणि हॉटेल्स शंभर टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी दिली आहे.
रेस्टॉरंट्सला मात्र यात शिथिलता दिलेली नाही, ती बंदच असणार आहे. त्याचप्रमाणे खासगी बसेसलासुद्धा परवानगी देण्यात आली आहे. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे. या अनलॉकची अंमलबजावणी गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशीपासून करण्यात येणार आहे.
जाणून घ्या काय सुरु राहणार:
लॉज आणि हॉटेल्स, खासगी/मिनी बस, आंतरराष्ट्रीय विमान प्रवास (गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार), रिक्षामध्ये चालकासह २ तर चारचाकी वाहनात चालकासह ३ प्रवाशांना मुभा देण्यात आली आहे.
जाणून घ्या काय बंद राहणार:
रेस्टॉरंट्स आणि बार, नाट्य व सिनेमागृह, जिम, स्विमिंग पूल, लोकल, मेट्रो, रेल्वेसेवा, शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळं, सामाजिक/राजकीय, क्रीडा, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाना बंदी.