मुंबई। दि. ७ ऑक्टोबर २०२५: राज्यातील अतिवृ्ष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा लागली असून आजच्या मंत्रिमंडळब बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे आजच शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा होणार असल्याची माहिती होती, तसेच दिवाळीपूर्वीच बळीराजाच्या खात्यावर मदतनिधी जमा होईल, असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सांगितले होते.
दिवाळी सणाला अवघे काही दिवस राहिल्याने आता शेतकऱ्यांना कधी आणि किती मदत जाहीर होईल याचीच वाट महाराष्ट्र पाहत होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी मदत पॅकेजची घोषणा केली आहे. त्यानुसार, ज्या शेतकऱ्यांची जमीन अतिवृष्टीच्या पाण्यात वाहून गेली, त्यांना हेक्टरी 3.47 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच, अतिवृष्टीग्रस्तांसाठी तब्बल 31 हजार 628 कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे.
राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही हीच मागणी केली असून महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकजेची घोषणा केली असून सर्वांनाच मदत होईल, असे प्रयत्न सरकारचे या पॅकेजमध्ये दिसून आले आहेत. शेतकरी, नुकसानग्रस्त घरे, जमिनी आणि जनावरांच्या नुकसानीसाठीही भरीव मदत देण्याचा शासनाचा निर्णय आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज काही महहत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये, ऐतिहासिक वारशांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांच्या सुशोभीकरण प्रकल्पांना सरकारने मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, या कामांसाठी 358.89 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे.
![]()


