नाशिकमधील या महाविद्यालयात इस्रोचे अभ्यासक्रम केंद्र सुरु : निशुल्क करता येणार नोंदणी

नाशिक (प्रतिनिधी) :  इस्रो या संस्थेची घटकसंस्था असलेल्या इंडियन इंस्टीटूट ऑफ रिमोट सेन्सिंग (IIRS-ISRO) देहरादून यांच्यातर्फे रिमोट सेन्सिंगच्या मुलभूत गोष्टीवर प्राध्यापक, व्यावसायिक, आणि विद्यार्थी यांच्यासाठी विशेष अभ्यासक्रम (IIRS-ISRO Outreach Programme) कार्यान्वित करण्यासाठी अधिकृत केंद्र म्हणून महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयातील भूगोलशास्त्र विभागास मान्यता देण्यात आलेली आहे. याबाबतचे परवानगी पत्र महाविद्यालयास प्राप्त झाले आहे.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात दुपारी ३ वाजेपर्यंत झाले 'इतके' टक्के मतदान…

महाविद्यालयातील तसेच महाविद्यालया बाहेरील विद्यार्थी, प्राध्यापक, व्यावसायिक यांना रिमोट सेन्सिंग व GIS या संदर्भात संशोधन व अभ्यास यासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. त्याचबरोबर इंडियन इंस्टीटूट ऑफ रिमोट सेन्सिंग (IIRS-ISRO ) देहरादून यांच्याकडून 60 IIRS Outreach Programme on Application of Geoinformatics in Ecological Studies (कोर्स कालावधी १३ जुलै ते २४ जुलै २०२०) व 61 IIRS  Outreach Programme on Satellite Photogrammetry and it’s Applications (कोर्स कालावधी २९ जून ते ०३ जुलै २०२०) ची घोषणा करण्यात आलेली आहे. सदर कोर्सेस हे ऑनलाईन पूर्ण करता येणार आहे.

हे ही वाचा:  नाशिक: वेब कास्टिंग कक्षाद्वारे जिल्ह्यातील मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे निरीक्षण

महत्वाची बाब म्हणजे यासाठी नोंदणी पूर्णपणे निशुल्क आहे. अधिक माहितीसाठी elearning.iirs.gov.in या संकेत स्थळास भेट द्यावी.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790