नाशिक (प्रतिनिधी): राज्यात प्रतिबंध असलेला सुमारे साडे चार लाखांचा गुटखा हस्तगत करण्यात क्राईम ब्रँच युनिट १च्या पथकाला यश आले.
याप्रकरणी विडी कामगार वसाहतीत एकाला अटक करीत त्याच्याकडून ४ लाख ३१ हजार ६७० रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला. उमेश बाळू लुंगे (वय ३०, स्वामी विवेकानंद नगर विडी कामगार वसाहत) असे संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहीती अशी काल मंगळवारी (ता.१५) गुन्हे शाखा युनीट एकचे पोलिस अंमलदार मुक्तार निहाल शेख यांना मिळालेल्या माहीतीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विडी कामगार वसाहतीत हनुमान मंदीरामागील खोलीत तपासणी केली असता, तेथे राज्यात प्रतिबंधित असलेला गुटका सुगंधित तंबाखू, पानमसाला असा सुमारे ४ लाख ३१ हजाराचा मुद्देमालाचा साठा केला असल्याचे आढळले.
याप्रकरणी पोलिसांनी संशयितासह मुद्देमाल ताब्यात घेत कारवाई केली. त्यात, पोलिस हवालदार रामदास भडांगे यांच्या फिर्यादीवरुन आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, उपनिरीक्षक्ष चेतन श्रीवंत, प्रविण वाघमारे, योगीराज गायकवाड, संदीप भांड, विशाल देवरे, रामदास भडांगे, मुक्तार शेख, राजेश राठोड आदीच्या पथकाने ही कारवाई केली.