Amazon

नाशिक: लाकडाचा ठोकळा डोक्यावर पडला, अठरा वर्षीय अरुणचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर शोककळा

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक: लाकडाचा ठोकळा डोक्यावर पडला, अठरा वर्षीय अरुणचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर शोककळा

नाशिक (प्रतिनिधी): लाकडी ठोकळा डोक्यावर पडल्याने झालेल्या रक्तस्रावामुळे अठरा वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अरुण कुमार मांडवी असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

तो नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरातील आनंदवल्ली शिवारात राहत होता. नेहमीप्रमाणे कामावर गेल्यानंतर काम सुरु असताना ही घटना घडली.

🔎 हे वाचलं का?:  सुरगाण्यात ३.३ रिश्टर स्केलचा भूकंप; नाशिक शहरापासून ५३ किलोमीटरवर केंद्रबिंदू

मूळचा परराज्यातील असणारा अरुण हा कामानिमित्त नाशिक शहरात वास्तव्यास होता. शहरातील गंगापूर रोड भागातील एका बांधकाम साईटवर तो कामगार म्हणून जात होता. 31 मार्च रोजी नेहमीप्रमाणे साईटवर गेल्यानंतर काम सुरु होते.

नाशिक: 66 लाखांची लुट करणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या; लुटीच्या पैशातून केली मौजमजा

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पोलीस असल्याची बतावणी करत दोन तोळ्यांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास

अशातच बांधकाम साईटवरील वरच्या माळ्यावरुन अचानक एक लाकडी ठोकळा त्याच्या डोक्यात पडला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. डोक्यावर ठोकळा पडल्याने रक्तस्राव अधिक झाल्याने त्याला भाऊ गणेश भगत याने तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले.

उकळत्या तेलाच्या कढईत पडून होरपळली, नाशिकमध्ये सहा वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत

अरुण हा आनंदवल्ली शिवारात वास्तव्यास होता. त्या ठिकाणाहून तो कामावर जात असे. दरम्यान 31 मार्च रोजी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर गेला. यावेळी काम सुरु असताना अचानक लाकडी ठोकळा त्याच्या डोक्यात पडला. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवसांच्या उपचारानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे तापसी अंमलदार झिरवाळ यांनी सांगितले. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790