Amazon

नाशिक: सोशल मीडियावर ओळख; धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नाशिक: सोशल मीडियावर ओळख; धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नाशिक (प्रतिनिधी): अल्पवयीन मुलीशी सोशल मीडियावर ओळख करून तिच्या आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  सुरगाण्यात ३.३ रिश्टर स्केलचा भूकंप; नाशिक शहरापासून ५३ किलोमीटरवर केंद्रबिंदू

या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात एक अल्पवयीन ब्लॅक आणि एका युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाय या प्रकरणी संशयित हेमंत भगवान शिरोडे याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीशी सोशल मीडियावर जुलै २०२१ मध्ये अल्पवयीन ब्बाळक व संशयित आरोपी हेमंत शिरोडे (वय: २४, पाथर्डी गाव) यांची ओळख झाली. या ओळखीतून त्यांच्यात मैत्री झाली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एफडीएकडून ४८ लाखांचा फ्राइड कांदा आणि तेलाचा साठा जप्त

त्यानंतर पीडितेला तिच्या आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत जुलै २०२१ ते जानेवारी २०२३ या दरम्यान संशयिताने शहरातील वेगवेगळ्या लॉजवर नेऊन त्यांनी पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणात पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790