नाशिक: धनदाई लॉन्सजवळ रिक्षा पलटी झाल्याने प्रवासी महिला ठार

नाशिक (प्रतिनिधी): धनदाई लॉन्स भागात भरधाव दुचाकीने अ‍ॅटोरिक्षास धडक दिल्याची घटना झाली होती. या अपघातात पलटी होवून एका महिला प्रवाश्याचा मृत्यू झाला तर चालक जखमी होता.

याप्रकरणी दुचाकीस्वाराविरूध्द पंचवटी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोहर पंढरीनाथ बोरसे (३० रा.शिंदेनगर, मखमलाबादरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दुचाकीस्वाराचे नाव आहे.

हे ही वाचा:  ओझर विमानतळावर प्रवाशांची विक्रमी नोंद; एकाच दिवसात १२२८ जणांनी केला प्रवास !

पंचवटीतील धनदाई लॉन्स भागात गेल्या बुधवारी (दि.२१) हा अपघात झाला होता. मोरे मळा चौफुली कडून चोपडा लॉन्सच्या दिशेने जाणा-या एमएच १५ एफ यू २९३५ या अ‍ॅटोरिक्षास समोरून विरूध्द दिशेने भरधाव येणा-या एमएच ४१ बीए ६१० या दुचाकीने धडक दिली होती.

तुम्ही नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन केला आहे का ?

या अपघातात दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात रिक्षा पलटी झाल्याने मंदाबाई बन्सीलाल करपे (६५ रा.मखमलाबाद) या प्रवासी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हे ही वाचा:  नाशिक: फ्लॅट घेण्यासाठी २० लाख रुपये आणत नसल्याने विवाहितेचा छळ

तर चालक मोहन भास्कर क्षिरसागर (५५ रा.पेठरोड) हे जखमी झाले होते. तसेच या घटनेत दोन्ही वाहनांचेही मोठे नुकसान झाले. तपासा अंती पोलिस नाईक अमोल काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुचाकीस्वार बोरसे याच्याविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खैरणार करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790