नाशिक: अल्पवयीन मुलाविरोधात पोक्सोअन्वये गुन्हा दाखल; गर्भपाताच्या त्रासाने घटना उघडकीस

नाशिक (प्रतिनिधी):  अंबड परिसरात नात्यातीलच अल्पवयीन संशयिताने अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध केले. यातून पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर संशयिताने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या.

यामुळे झालेल्या असह्य त्रासामुळे सदरील घटनेची वाच्यता झाली. याप्रकरणी पीडितेच्या पालकांनी पोलीसात संशयिताविरोधात तक्रार दिली.

त्यानुसार अल्पवयीन संशयिताविरोधात अंबड पोलिसात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे अल्पवयीन मुलांमध्ये वाढत असलेल्या वासनांधतेची समस्या समाजासाठी चिंताजनक आहे.

हे ही वाचा:  नाशिक: अट्टल घरफोड्यास निमाणीतून अटक! 3 गुन्ह्यांची उकल

१७ वर्षीय अल्पवयीन संशयित मुलगा हा ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरामधील विठ्ठलवाडी येथील श्रीराम नगर परिसरात राहणार आहे. त्याचे सिडकोत राहणाऱ्या नातलगांकडे त्याचे नेहमी येणे-जाणे होते.

याच दरम्यान त्याचे साडे सोळा वर्षांच्या पीडितेशी प्रेमसंबंध जुळले. त्यातून त्यांच्यात जानेवारी २०२२ ते २३ जून २०२३ यादरम्यान पीडित मुलीच्या घरातच शारीरिक संबंध आले. यातून पीडित मुलगी गर्भवती राहिली.

हे ही वाचा:  २ महिन्यांच्या मुलीची ५ लाखांत विक्री; नाशिकमधील आईसह ९ जणांना अटक !

सदरची बाब तिने संशयिताला सांगितली. त्याने तिला १६ जून रोजी गर्भनिरोधक गोळ्या देत तिचा गर्भपात केला. मात्र कोणत्याही वैदयकीय सल्ल्याशिवाय गर्भपाताच्या गोळ्या पीडितेने घेतल्याने तिला असह्य असा त्रास होऊ लागला.

त्यामुळे या घटनेची वाच्यता झाली. त्याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांनी नात्यातील संशयित अल्पवयीन मुलीविरोधात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक नाहीद शेख करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group