ALERT: नाशिक शहरात बुधवारी (दि. ५ जानेवारी) कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात बुधवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ५ जानेवारी) एकूण ५०८ कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: ४१३, नाशिक ग्रामीण: ७७, मालेगाव: २, तर जिल्हा बाह्य: १६ असा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात बुधवारी २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दोनही रुग्ण नाशिक ग्रामीणमधील आहेत. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८७६१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण ८८ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण १४६१ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यापैकी एकूण ११२९ रुग्ण हे नाशिक महानगरपालिका हद्दीतील आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक शहरातील या भागात बुधवारपासून (दि. ५ जानेवारी) एकेरी वाहतूक
Breaking: नाशिकला कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे यंत्रणेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय