Alert: नाशिकरांनो काळजी घ्या… आजपासून पुढील चार दिवस नाशिकला उष्णतेची लाट

नाशिक (प्रतिनिधी) : उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असताना नाशिकमध्येही तापमान चाळीशीकडे झुकते आहे.

उन्हाचा पारा वाढल्याने दुपारच्या सुमारास रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे.

तापमानाने ४० अंशांचा टप्पा गाठल्याने उन्हाच्या झळा आणखीनच तीव्र झाल्या आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थासाठी साधुग्राम, मंडप व्यवस्थेचा आढावा; २०१५च्या कुंभमेळ्यातील अनुभवाचा नियोजनात उपयोग

सोमवारी (ता. २८) कमाल ३९.४, तर किमान तापमान २०.४ अंश नोंदविले गेले.

गत काही दिवस तापमानात सतत वाढ होत आहे. मार्चच्या अखेरीस तापमान चाळीशीकडे झुकल्याने दिवसभर नागरिकांना उन्हाच्या झळा बसताना दिसत आहे. गत आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे कमाल आणि किमान तापमान कमी झाले होते, मात्र उष्णता वाढली होती. आता पुन्हा तापमान वाढत असून नाशिककर तापले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; गुन्हे शाखा युनिट-२ची कारवाई

किमान तापमान २४ अंशांच्या वर गेले आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी विक्रेते हिरव्या नेट चा वापर करताना दिसत आहे. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी टोपी, स्कार्फचा वापर करताना दिसून येत आहे. उन्हाची काहिली वाढल्याने नागरिकांनी शीतपेयांना पसंती दिली आहे. ठिकठिकाणी शीतपेये विक्रेते दाखल झाले आहेत. एप्रिलमध्ये उकाडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
शहरातील कमाल तापमान: सोमवार – ३९.४, रविवार – ३८.८, शनिवार – ३७.५, शुक्रवार – ३७.२

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790