HomeAd

नाशिक: द्वारका चौकात टँकरने दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): टँकरने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झाल्याने पहाटे झालेल्या अपघातात महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुनंदा चोरडिया (वय 54, रा. अशोका मार्ग) असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आज पहाटे 6.30 वाजेच्या सुमारास सुनंदा चोरडीया आपल्या पतीसमवेत अशोका मार्गावरील निवासस्थानाकडून ठक्कर बझारकडे जात होत्या. द्वारका चौकात त्यांना एका टँकरने जोरात धडक दिली.

👉 हे ही वाचा:  नाशिक: विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने अनेक भागातील वीजपुरवठा खंडित; कधी होणार सुरळीत, जाणून घ्या सविस्तर…

या अपघातात त्यांच्या हाताला पायाला व डोक्याला गंभीर जखमा झाल्याने त्यांचे पती राजेंद्र चोरडिया यांनी त्यांना खासगी अ‍ॅम्ब्युलन्समधून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र सव्वा आठ वाजेच्या दरम्यान उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

👉 हे ही वाचा:  नाशिक: वाहन फोडून रोख रक्कम चोरीप्रकरणी आंतरराज्य टोळी जेरबंद; 5.59 लाखांचा मुद्देमाल हस्तगत !

या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.  अपघातानंतर चालक घटनास्थळावरुन पळून जात होता. त्यावेळी राणेनगर परिसरात चालकास वाहनासह ताब्यात घेण्यात आले. वाहन चालकाचे नाव शिवशंकर यादव असल्याचे समजते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790