नाशिक: जीवे मारण्याची धमकी देत २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार

नाशिक: जीवे मारण्याची धमकी देत २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार

नाशिक (प्रतिनिधी): जीवे मारण्याची धमकी देत २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.

याबाबत पिडीत तरुणीने अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

२५ वर्षीय तरुणीस रुमवर नेत जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यासोबत कुकर्म करण्यात आल्याची घटना एक्सलो पॉईंट परिसरात घडली.

हे ही वाचा:  नाशिक: शहरात महावितरणचे छापे; वीज चोरीचे गुन्हे दाखल !

अंबड पोलिसांनी याप्रकरणी संशयिताविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित विरेंद्र कृष्णा सुर्यवंशी (रा. काकडे महाराज आश्रम शाळेजवळ, दत्तनगर) असे संशयिताचे नाव आहे. पिडीत तरुणी १५ जानेवारीला अंबडमधील सोनाली वाईन शॉप समोरून जात असताना संशयित मोटार सायकलवरून आला. त्याने पिडीतेला धमकावत दुचाकीवरून रुमवर नेले. तिथे जीवे मारण्याची धमकी देत पिडीतेच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध प्रस्थापित केले. पिडीतेच्या तक्रारीन्वये अंबड पोलिसांनी भादंवि ३७६(१) अन्वये गुन्हा नोंदवला असून उपनिरीक्षक फडोळ तपास करत आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक शहरातील या मार्गावर आजपासून (दि. २० जानेवारी) एकेरी वाहतूक
नाशिक: फसवणूक करून तब्बल ५ वर्षे फरार होता हा पठ्ठा.. अखेर अडकला क्राईम ब्रांचच्या जाळ्यात

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790