news

नाशिक: दोन दुचाकींच्या धडकेत महिला ठार

नाशिक: दोन दुचाकींच्या धडकेत महिला ठार

नाशिक (प्रतिनिधी): दोन दुचाकींच्या धडकेत महिला ठार झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे..

या अपघातात दोन जण जखमी सुद्धा झाले आहेत.

त्र्यंबक रोडवरील हॉटेल संस्कृतीजवळ हा अपघात घडला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात दुचाकीचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जागतिक महिला दिनानिमित्त १५ लाख मुलींना आत्मरक्षण आणि योगाचे धडे!

पोलिसांनी दिलेली माहिती सागर शेळके (रा. अशोकनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एमएच १५ एचबी ११४७ या क्रमांकाच्या दुचाकीवरील संशयित चालकाने वेगात दुचाकी चालवत एमएच १५ एफआर ६६४४ या क्रमांकाच्या दुचाकीला समोरून धडक दिली. यात शेळके यांची सून दीक्षा अनुराग शेळके यांच्या डोक्यास गंभीर मार लागला. पाठीमागे बससेल्या विद्या भरत जाधव या गंभीर जखमी झाल्या तसेच संशयित दुचाकीचालकाच्या पाठीमागे बसलेला अक्षय संजय जगताप (रा. शिवाजीनगर) हा जखमी झाल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रंगपंचमीसाठी शहरात कडेकोट बंदोबस्त; २ हजार पोलिस, ९०० होमगार्ड तैनात

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”9040,9050,9057″]

जखमींना दवाखान्यात दाखल केले. उपचार सुरू असताना दीक्षा शेळके यांचा मृत्यू झाला. अपघातात दोन्ही दुचाकींचे नुकसान झाले. वरिष्ठ निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790