या श्रावणात तरी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेस परवानगी मिळणार का ? जाणून घ्या…
नाशिक (प्रतिनिधी): त्र्यंबकेश्वर येथे श्रावण महिन्यात ब्रह्मगिरी पर्वतास प्रदक्षिणा करतात. यात २० किलोमीटर व ४० किलोमीटर अशा दोन प्रकारच्या प्रदक्षिणा असतात. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून हा पर्वत प्रसिद्ध आहे.
दरवर्षी लाखो भाविक या प्रदक्षिणेस हजेरी लावत असतात. मात्र गेल्यावर्षी ही प्रदक्षिणा कोविडमुळे रद्द करण्यात आली होती. यावर्षीदेखील कोविडमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता गृहित धरून रद्द करण्यात आली असल्याचे महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत तहसील कार्यालयात प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे, सहायक गटविकास अधिकारी पाठक, मंडल अधिकारी, तलाठी व संबंधित इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा निर्णय झाला. ८ ऑगस्टपासून श्रावण महिन्यात सुरुवात होत आहे. या प्रदक्षिणेस काही भक्त महिनाभर पायी जाण्याचा नियम करतात. काही श्रावण सोमवारी तर काही तिसऱ्या श्रावण सोमवारी हजेरी लावतात. मात्र यावर्षीही कोरोनामुळे ते शक्य होणार नाही.
आढावा बैठक झाली: नाशिकमधील निर्बंध आणि विकेंड लॉकडाऊनबाबत महत्वाचा निर्णय..
नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत झाले इतक्या लाख नागरिकांचे लसीकरण…