आढावा बैठक झाली: नाशिकमधील निर्बंध आणि विकेंड लॉकडाऊनबाबत महत्वाचा निर्णय..

आढावा बैठक झाली: नाशिकमधील निर्बंध आणि विकेंड लॉकडाऊनबाबत महत्वाची बातमी..

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी कोरोनासंदर्भातली आढावा बैठक पार पडली. या बैठकीत कोरोना रुग्णांची आकडेवारी आणि सध्याची परिस्थिती याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा घेतला.

या बैठकीत ठरल्याप्रमाणे, नाशिक शहरातील निर्बंध आणि वीकेण्ड लॉकडाऊन यापुढेही कायम राहणार आहेत. निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय हा राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या टास्क फोर्सच्या हाती आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्बंध जैसे थेच राहतील, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी दुपारी झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. नाशिकमधील कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात असून, शहरात 600, तर जिल्हाभरात १ हजार रुग्ण उपचार घेताहेत. दररोज सरासरी दीडशे रुग्ण बाधित आढळत आहेत. त्यामुळे नाशिकमधील निर्बंध शिथिल करावेत आणि दुकानांच्या वेळांत वाढ करावी, अशी मागणी व्यापार्‍यांकडून केली जातेय. मात्र, तिसर्‍या लाटेच्या भितीने लगेचच निर्बंध शिथील करणं जिल्हा प्रशासनाच्या अंगलट येऊ शकतं. त्यातही निर्णयाचे अधिकार टास्क फोर्सच्या हाती असल्यानं, निर्बंध शिथिलतेसाठी नाशिककरांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ३० जुलै २०२१) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
प्रशासनाला आली जाग: खून झाल्यानंतर सिडकोतील सोनाली हॉटेल सील..