बिटको हॉस्पिटल येथील सिटी स्कॅन मशीन कार्यान्वित

नाशिक (प्रतिनिधी): बिटको हॉस्पिटल येथे बसविण्यात आलेले सिटी स्कॅन मशिन नागरिकांसाठी आयुक्त कैलास जाधव यांनी  कार्यान्वित केले तसेच येथील कामकाजाचा आढावा यावेळी त्यांनी घेतला. नाशिक शहर व परिसरातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन विविध पातळीवर कामकाज करत असताना रूग्णांना जास्तीत जास्त सेवा सुविधा देण्यावर महापालिका प्रशासनाच्या वतीने भर दिला जात आहे.

🔎 हे वाचलं का?:  निफाड ड्राय पोर्ट ठरणार नाशिकसाठी मोठे मल्टी-मॉडेल लॉजिस्टिक्स हब; कृषी निर्यात, उद्योग आणि रोजगाराला मिळणार मोठी चालना

या अनुषंगाने बिटको रूग्णालयात सिटीस्कॅन मशिन बसवण्यात आलेले असून त्याठिकाणी रेडिओलॉजिस्ट नेमणूक करण्यात आली असून सिटीस्कॅन मशिन नागरिकांसाठी मा.आयुक्त कैलास जाधव यांनी  कार्यान्वित केले.या सिटीस्कॅन मशिन द्वारे एच. आर. सि.टी. चेस्ट प्रती चाचणीचे दर मनपाने निश्चित केले असून मनपा अंतर्गत दवाखाने, रुग्णालये, प्रसूतिगृहे येथील रुग्णांकरिता १००० रुपये व इतर खाजगी दवाखाने, रुग्णालये, प्रसूतिगृहे येथील रुग्णांकरिता १५०० रुपये इतका दर निश्चित करण्यात आलेला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक तहसील कार्यालयातर्फे जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव

तसेच शहरातील रुग्णालयात नातेवाईकांकडून दवाखान्यांमध्ये होणारी गर्दी  टाळण्यासाठी विविध सूचना करण्यात आल्या होत्या. त्या सूचनांच्या अंमलबजावणीच्या पार्श्‍वभूमीवर आयुक्त कैलास जाधव यांनी यावेळी  पाहणी केली. तसेच तेथील रुग्णांना औषध उपचार, नाश्ता, जेवण, चहापान आदींची व्यवस्था योग्य रितीने होत आहे की नाही याबाबत सविस्तर आढावा घेऊन सुरक्षे बाबत कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागास व उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी आयुक्तांनी दिल्या.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790