रेशन कार्ड धारकांना आधार व मोबाईल नंबर लिंक करणे बंधनकारक; जाणून घ्या अंतिम मुदत…

नाशिक (प्रतिनिधी) : अन्न व पुरवठा विभागाने रेशन वितरण यंत्रणेचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने रेशन कार्डचा वापर करणाऱ्या प्रत्येकाला रेशन दुकानामध्ये जाऊन रेशनकार्ड आधार आणि मोबाईल क्रमांकाला लिंक करावे लागणार आहे. यामधून खरे गरजू कोण? हे समोर येणार असून बोगस रेशनकार्ड धारकही समजणार आहेत.

 लिंक करण्याच्या प्रक्रियेसाठी संपूर्ण जानेवारी महिन्याचा वेळ कार्ड धारकांना देण्यात आला असून ३१ जानेवारी हि अंतिम मुदत आहे.स्वस्त धान्याचा लाभ गरजू लोकांनाच मिळावा,याबरोबरच लाभार्थ्यांचे लिंकिंग असावे यासाठी यंत्रणेचे संगणकीकरण करण्याचा निर्णय अन्न व पुरवठा विभागाने घेतला आहे. लिंकिंग करण्याविषयीची माहिती रेशन दुकानदार देखील कार्डधारकांना देणार आहेत. या मोहिमेतून रेशनकार्ड पुरवठा विभागातून नक्की किती कार्डांचे वाटप झाले, हि संख्या समोर येणार असल्याने पर्यायाने बोगस कार्ड धारक किती आहेत हेही समजणार आहे. म्हणून रेशन कार्डला आधार व मोबाईल नंबर लिंक करणे बंधनकारक केले आहे.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790