नाशिक शहराच्या ‘या’ भागांतील वीजपुरवठा शनिवारी (दि. २१) बंद राहणार !

नाशिक। दि. २० नोव्हेंबर २०२६: नाशिक शहरातील १३२ केव्ही टाकळी उपकेंद्र येथे देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने नाशिक रोड व उपनगर परिसरातील वीज पुरवठा शनिवार २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ०९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

यामध्ये खालील परिसरातील वीज पुरवठा प्रभावित राहील.
👉 यामध्ये टागोर नगर, के. के. वाघ स्कूल, रेयान इंटरनॅशनल स्कूल, डी.जी.पी. नगर, गणपती मंदिर, ईरिगेशन कॉलनी, अशापुरा, औरंगाबाद सोसायटी, उत्सव चौक, सर्वज्ञ नगर, अजिंक्यतारा सोसायटी व बँक ऑफ इंडिया कॉलनी, उपनगर, शांती पार्क, रामदास स्वामी नगर (लेन क्र. १, २ व ३), खोडदेनगर, साळवे मळा, इंद्रायणी सोसायटी, प्रेरणा सोसायटी, जय भवानी नगर तसेच…

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याची तयारी; फायबर नेटवर्कचाही होणार विस्तार

👉 समता नगर, क्षीरसागर मळा, जामकर मळा, शिंदे मळा व शेलार लॉन्स परिसर, अभिष नगर, पंचशील नगर, दत्त मंदिर, दीप नगर, विद्युत कॉलनी, सहकार कॉलनी, एन. के. नगर, एल.आय.सी. सोसायटी, छोटी जनता परिसर, संजय गांधी नगर, टागोर नगर, विजय ममता थिएटर व जे.के. टायर, टाकळी रोड परिसर, पगारे मळा, अयोध्या नगर, इच्छामणी मंदिर परिसर, सिंधी कॉलनी, व्यापारी बँक परिसर, आंबेडकर चौक, शांती पार्क, श्रम नगर, महाराष्ट्र हायस्कूल व आयकर स्टेट, नाशिक-पुणे रोड त्याचप्रमाणे….

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा आवळून खून

👉 उपनगर पोलीस स्टेशन परिसर, आय.एस.पी. गेट व जय भवानी रोड, मनोहर गार्डन, जेतवन नगर, आशीर्वाद कॉलनी, कदम मळा, डावखरवाडी, फर्नांडिसवाडी, जीवनविहार सोसायटी, जाचक मळा, वास्तू पार्क, लवटे नगर (१ व २), आवटे मळा, अडके नगर (१, २ व ३), दुर्गा नगर, खोले मळा, सेंटर गेट, डायमंड नगर, रोकडोबा वाडी, शहाणे मळा, भालेराव मळा, माणिक नगर, सर्वेश पार्क, गोदावरी कॉलनी व हरिओम नगर या भागाचा समावेश आहे. शक्य झाल्यास दुसऱ्या वाहिनीवर वीज पुरवठा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत अर्जातील त्रुटींची तातडीने पूर्तता करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन

देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास किंवा तांत्रिक कारणास्तव वेळ लागल्यास त्यानुसार वीज पुरवठा सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ कडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790