Amazon

नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला ! किमान तापमान १२.६ अंशांवर

नाशिक। दि. १५ नोव्हेंबर २०२६: शहरात थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढू लागला असून किमान तापमानात सातत्याने घट होत आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे रात्री आणि पहाटेच्या वेळी नाशिककरांना बोचऱ्या थंडीचा अनुभव येत आहे. आज, रविवार (दि. १५ नोव्हेंबर) शहराचे किमान तापमान १२.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. त्यामुळे गेल्या काही दिवसांच्या तुलनेत थंडीची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवृत्तीवेतनधारकांसाठी स्मार्टफोनवरून हयातीचा दाखला सादर करण्याची डिजिटल सुविधा

मागील आठवड्यात १४ अंशांच्या आसपास असलेले किमान तापमान आता घसरू लागले आहे. हवामान कोरडे राहण्यासह आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असल्याने थंडीचा प्रभाव आणखी वाढण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसा स्वच्छ सूर्यप्रकाश असला तरी सकाळी आणि रात्री गारठा अधिक जाणवण्याची शक्यता आहे.

🔎 हे वाचलं का?:  चेंबूरमधून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची नाशिकमध्ये सुखरूप सुटका; संशयित ताब्यात

वाढत्या थंडीमुळे नागरिकांनी आता उबदार कपड्यांचा वापर सुरू केला आहे. विशेषतः पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणारे नागरिक, दुचाकीस्वार आणि कामानिमित्त लवकर घराबाहेर पडणाऱ्यांना थंडीचा अधिक सामना करावा लागत आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरातही थंडीचा कडाका वाढला आहे. शनिवारी तेथील किमान तापमान ११.५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. गोदाकाठच्या परिसरात पहाटेच्या वेळी हुडहुडी भरवणारी थंडी जाणवत असून काही ठिकाणी नागरिक शेकोटीचा आधार घेताना दिसत आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आधाराश्रमातील बालकाला मिळाले परदेशी दाम्पत्याचे मायेचे छत्र !

दिवाळीनंतर थंडीचा जोर वाढेल, असा हवामान अभ्यासकांनी वर्तवलेला अंदाज आता प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. आगामी काळात तापमानात आणखी घट झाल्यास नाशिककरांना थंडीचा अधिक कडाका अनुभवायला मिळू शकतो.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790