Amazon

नाशिक: शहरातील ‘या’ वाहतूक मार्गांत दोन दिवस महत्वाचे बदल

नाशिक। दि. १५ नोव्हेंबर २०२६: छट पूजेनिमित्त रामकुंड परिसरात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत. रविवारी (दि. १५) दुपारी ३ ते सोमवारी (दि. १६) सकाळी १० वाजेपर्यंत रामकुंड परिसरातील प्रमुख रस्त्यांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आधाराश्रमातील बालकाला मिळाले परदेशी दाम्पत्याचे मायेचे छत्र !

यंदा छट पूजेसाठी सुमारे ५० ते ६० हजार भाविक येण्याचा अंदाज आहे. या भागातील रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये आणि भाविकांसह स्थानिक नागरिकांची गैरसोय टाळता यावी, यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

हे मार्ग होणार बंद:
मालेगाव स्टॅण्ड, ढिकले वाचनालय, खांदवे सभागृह, सरदार चौक, गणेशवाडी आणि दिल्ली दरवाजा ते रोकडोबा मैदान या मार्गांवरून रामकुंडाकडे जाणारी-येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहील.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला ! किमान तापमान १२.६ अंशांवर

पर्यायी मार्ग: वाहने गणेशवाडी- काटया मारूती पो. चौकी – निमाणी बसस्थानक – पंचवटी कारंजा यामार्गाने येतील व जातील.

भाविकांसाठी पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी:
गौरी पटांगणात जाण्यासाठी मार्ग:
मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, दिंडोरीना, सेवाकुंज, काट्या मारुती चौकी, देवी मंदिर, मुंजोबा चौक, आयुर्वेद हॉस्पिटल, मारी माता मंदिर.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: महसूल सेवक (कोतवाल) पदभरती परीक्षा आता १७ जानेवारी २०२७ रोजी !

शिंदे मळ्यात जाण्यासाठी मार्ग: मुंबई-आग्रा महामार्ग, ट्रॅक्टर हाऊस, नानावली पोलिस चौकी, अमरधाम पूल अथवा काट्या मारुती चौकी, देवी चौक, पंचवटी अमरधाम.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790