Amazon

दिवाळीतच नाशिकमध्ये थंडीची चाहूल; किमान तापमान १४.३ अंशांवर

नाशिक। दि. ९ नोव्हेंबर २०२६: यंदा दिवाळीच्या सणासोबतच नाशिकमध्ये थंडीचे आगमन झाले आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात उन्हाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या नाशिककरांना आता गारव्याचा अनुभव येऊ लागला आहे. सोमवारी (दि. ९ नोव्हेंबर) शहरातील किमान तापमानाची नोंद १४.३ अंश सेल्सिअस इतकी झाली. हवामान कोरडे राहिल्याने वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण ६५ टक्के नोंदविण्यात आले.

वसूबारसेपासूनच शहरात थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली होती. शनिवारी रात्रीपासून हवेत गारवा वाढल्याने रविवारी पहाटे अभ्यंगस्नानासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना थंडीची तीव्रता जाणवली. विशेषतः पहाटे पाच ते सकाळी साडेसात या वेळेत गारठा अधिक होता. मात्र, आकाश निरभ्र राहून सूर्यप्रकाश पसरल्यानंतर वातावरणातील थंडीचा जोर काहीसा कमी झाला.

🔎 हे वाचलं का?:  सीबीएसई बोर्ड १०वी, १२ वी परीक्षा १६ फेब्रुवारीपासून

यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे ऑक्टोबर महिन्यातही उन्हाचा तडाखा कायम होता. महिन्याच्या सुरुवातीपासून अखेरपर्यंत उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, तापमानात झालेली घट आणि कोरड्या हवामानामुळे आता उकाड्यापासून दिलासा मिळाला असून शहरात सध्या गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकरोडच्या अर्जुन पिवाल टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई

दिवाळीत थंडीची सुरुवात झाली असली, तरी आगामी काळात तिची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर थंडीचा कडाका अधिक जाणवू शकतो. मात्र, यंदा तीव्र स्वरूपाची बोचरी थंडी पडण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, निफाड तालुक्यातही यंदा थंडीचे आगमन उशिराने झाले आहे. गेल्या दोन दिवसांत तेथील तापमानात लक्षणीय घट झाली आहे. शनिवारी १२.७ अंश सेल्सिअस असलेले किमान तापमान रविवारी आणखी घसरून ११.८ अंशांवर पोहोचले. त्यामुळे निफाड परिसरातही थंडीचा जोर वाढू लागला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790