Amazon

नाशिकमध्ये थंडीची चाहूल; आज (दि. ८) किमान तापमान १४.२ अंशांवर

नाशिक। दि. ८ नोव्हेंबर २०२६: अखेर नाशिकमध्ये थंडीचे आगमन होऊ लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात गारवा वाढत असून, आज- रविवारी (दि. ८ नोव्हेंबर) शहराचे किमान तापमान १४.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. शनिवारी (दि. ७ नोव्हेंबर) हाच पारा १५ अंशांवर होता. रात्रीपासून जाणवणारा गारवा पहाटे अधिक तीव्र होत असून, सायंकाळच्या वेळीही थंडीचा अनुभव नाशिककरांना येत आहे.

🔎 हे वाचलं का?:  मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता तालुकास्तरावरही; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण निर्णय

यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे ऑक्टोबर महिन्यातही उन्हाचा कडाका कायम राहिला. सलग दोन महिने उष्णतेचा सामना करावा लागलेल्या नाशिककरांना यंदा थंडीची प्रतीक्षा करावी लागली. ऑक्टोबरमध्ये शहरातील कमाल तापमान ३५.६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. गेल्या दहा वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील ही सर्वाधिक तापमानाची नोंद ठरली.

🔎 हे वाचलं का?:  देवळाली कॅम्प येथे १३ नोव्हेंबर रोजी तोफखाना सराव; नाशिक व इगतपुरी तालुक्यातील काही गावांना सतर्कतेचा इशारा

साधारणपणे १५ ऑक्टोबरच्या आसपास जाणवणारी थंडी यंदा मात्र नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाली आहे. सध्या थंडीचा जोर मर्यादित असला, तरी आगामी काळात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, किमान तापमानात घट होत असली तरी कमाल तापमान अद्याप स्थिर आहे. शनिवारी शहरात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. सकाळच्या सुमारास हवेतील आर्द्रता ६५ टक्के, तर सायंकाळी २३ टक्के होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकरोडच्या अर्जुन पिवाल टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई

नाशिकच्या तुलनेत निफाडमध्ये थंडीचा प्रभाव अधिक जाणवू लागला आहे. शनिवारी निफाडचे किमान तापमान १२.७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. त्यामुळे आगामी दिवसांत उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790