Amazon

नाशिक: राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे पोलीस परेड ग्राउंड हेलिपॅड येथे आगमन व स्वागत

नाशिक। दि. २८ ऑक्टोबर २०२६: राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आज सकाळी पोलीस परेड ग्राउंड हेलिपॅड येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन होते. यावेळी प्रशासनाच्यावतीने राज्यपाल महोदयांचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्वागत केले.

🔎 हे वाचलं का?:  लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नाशिक परिक्षेत्रात 1 नाव्हेंबरपर्यत दक्षता जनजागृती सप्ताह

यावेळी महापौर हिमगौरी आडके- आहेर, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय ऐनापुरे, पोलिस आयुक्त डाॅ. संदीप कर्णिक, महानगरपालिका आयुक्त मनीषा खात्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ व्यंकट गीते, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, मविप्रचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, तहसीलदार पंकज पवार आदी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790