नाशिक। दि. २७ ऑक्टोबर २०२६: सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीच्या डाय-टूल विभागात क्रेनचा धक्का लागून २१ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. २६) सकाळी ८ वाजता घडली. सुमित रामदास सपकाळे (२१, रा. उत्तमनगर, मूळ पडळसा, ता. यावल, जि. जळगाव) असे मृत कामगाराचे नाव आहे. सुमित दोन महिन्यांपूर्वीच कंपनीत रुजू झाला होता.
गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई आणि बहीण असा परिवार आहे. पुढील महिन्यात बहिणीचा साखरपुडा होणार होता. त्यापूर्वी ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी सातपूर पोलिस तपास करत आहेत.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790


