Amazon

नाशिक: कालिका यात्रोत्सवानिमित्त शहरातील ‘या’ वाहतूक मार्गांत महत्वाचे बदल

नाशिक। दि. १० ऑकटोबर २०२६: मुंबई नाका परिसरातील श्री कालिका देवी यात्रोत्सवाला ११ ऑक्टोंबर पासून सुरवात होत आहे. ११ ते २० ऑक्टोंबर या कालावधीत भरणाऱ्या यात्रेसाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गडकरी चौक, मुंबई नाका आणि चांडक सर्कल परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

हे रस्ते राहणार बंद: गडकरी सिग्नल ते हॉटेल रुची दोन्ही बाजूंच्या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहिल. चांडक सर्कल ते संदीप हॉटेल दोन्ही बाजूंच्या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद (केवळ दुचाकी वाहनांना सूट)

🔎 हे वाचलं का?:  सप्तशृंगगडाच्या बसेस आता अशोकस्तंभ मार्गे धावणार; ९ ते २६ ऑक्टोबरदरम्यान वाहतूक मार्गात बदल

एसटी आणि सिटी लिंक बस मार्ग : महामार्ग स्थानकातून सुटणाऱ्या बस रुची हॉटेलसमोरील गेटमधून बाहेर पडून डावीकडे वळतील. तेथून सुयश हॉस्पिटल, चांडक सर्कल, गडकरी सिग्नल, सारडा सर्कल, मदिना चौक, आणि मुंबई नाका सर्कलमार्गे जातील. सिटीलिंक व इतर बस नाशिकरोड, संभाजीनगर व धुळेकडे मार्गावर जाणाऱ्या येणाऱ्या बस त्र्यंबकनाका सिग्नल, खडकळी सिग्नल, सारडा सर्कल, मदिना चौक व मुंबई नाका सर्कल मार्गे जातील.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेअर बाजारातील भरघोस परताव्याचे आमिष दाखवून ७५ लाखांचा ऑनलाइन गंडा

पर्यायी मार्ग : मुंबईनाका ते चांडक सर्कल मार्गावरील वाहने मुंबई नाका सर्कलवरुन रुची हॉटेल, एसएसके हॉटेल आणि चांडक सर्कलमार्गे जातील. मुंबई नाका ते गडकरी चौक मार्गावरील वाहने मुंबई नाका सर्कल, मदिना चौक, सारडा सर्कल, शिंगाडा तलावमार्गे जातील.

पार्किंग व्यवस्था : ईदगाह मैदान येथे हलकी चारचाकी व दुचाकी वाहने, महामार्ग स्थानक प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूचे काँक्रिटीकरण केलेले मैदान, जनलक्ष्मी बँकेमागील बाजू, एनडी पटेलरोड, गुरुद्वारा रोड, शताब्दी हॉस्पिटलखालील संदीप हॉटेल कॉर्नर ते श्रीहरी कुटे मार्ग, गोल्फ क्लब मैदानालगत, एलआयसी ऑफिस, म्हाडा समोरील सिंगल लेन पार्किंग असेल. (पार्किंगस्थळे सोडून पार्क केलेली वाहने टोईंग केली जातील) पार्किंग,

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790