राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

नाशिक। दि. १८ सप्टेंबर २०२६: राज्यातील लाखो विद्याथ्यांचे लक्ष लागलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये या परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. बारावीची लेखी परीक्षा सोमवार, आठ फेब्रुवारी ते मंगळवार, १६ मार्च, तर दहावीची सोमवार, १५ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत होणार आहे. सविस्तर वेळापत्रक नंतर जाहीर होणार असून, या तारखांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी नियोजन करता येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चोरीची मोटारसायकल विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या १८ वर्षीय तरुणाला अटक

मुंबई, राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. बारावीच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एचएससी) आणि दहावीच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षांचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे.

लेखी परीक्षांपूर्वी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा बुधवार, २० जानेवारी ते शनिवार, सहा फेब्रुवारी २०२७ या कालावधीत होणार आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा गुरुवार, २८ जानेवारी ते शनिवार, १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पूजा आंबेकर खूनप्रकरणी दीराला फाशीची शिक्षा; ३५ वार करून केली होती हत्या

विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे; तसेच परीक्षेच्या काळात त्यांच्यावरील ताण कमी व्हावा, या दृष्टीने मंडळाने परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक संबंधित विभागीय मंडळांच्या संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790