मार्श फाउंडेशन, बिलियन हार्ट्स बीटिंग फाउंडेशन आणि ‘अपोलो हॉस्पिटल्स’चा संयुक्त उपक्रम !

नाशिक। १ सप्टेंबर २०२६: नाशिक आणि परिसरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत वेळेत आणि प्रभावी आधुनिक वैद्यकीय उपचार मिळावेत, तसेच आरोग्यविषयक तातडीच्या सेवाव्यवस्था अधिक सक्षम व्हावी, या उद्देशाने मार्श फाउंडेशन, बिलियन हार्ट्स बीटिंग फाउंडेशन आणि अपोलो हॉस्पिटल्स यांच्या संयुक्त विद्यमाने दोन अत्याधुनिक एडव्हान्स लाईफ सपोर्ट सिस्टिमने सुसज्ज अँब्युलन्स सेवेत दाखल करण्यात आल्या असून, त्यानिमित्त आज अपोलो हॉस्पिटल्स, नाशिक येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली.
यावेळी बोलतांना हॉस्पिटल सिओओ दिप्तेन्दू पांडा यांनी नाशिकच्या आरोग्यक्षेत्रात हा एक मोठा टप्पा असून तातडीच्या वेळी योग्य वेळेत मिळालेली मदत जीवन वाचवण्यात खूप महत्वाची ठरते, रस्ते अपघात, ब्रेन स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका अश्या सर्व प्रकारच्या जोखमीच्या वेळी स्मार्ट अँब्युलन्स गेम चेंजर ठरू शकते.
ह्यात पेशंट आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऑडिओ-व्हिडीओ आणि सेन्सर्स च्या माध्यमातून हॉस्पिटलच्या इमरजंसी विभागासोबत जोडले असून पेशंटचे आरोग्यविषयक लाइव्ह रिपोर्ट्स पॅरामीटर्स हॉस्पिटल व तज्ञ डॉक्टर्सच्या मोबाईल मध्ये पाहता येतात व जोखमीचे उपचार तातडीने करणे शक्य होते, पेशंट हॉस्पिटलला पोहोचण्या आधीच उपचार करून जीवघेणी जोखीम टाळणे शक्य होते यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांपर्यंत आवश्यक वैद्यकीय सुविधा अधिक जलद पोहोचविण्यास तसेच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यास मदत होणार आहे असे सांगितले.
बिलियन हार्ट्स बिटिंग फॉउंडेशन च्या प्रमुख सुधा झिजारिया यांनी “आरोग्यसेवा रुग्णालयाच्या भिंतींपलीकडे घेऊन ती समुदायाच्या अधिक जवळ पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. या उपक्रमामुळे लोकांपर्यंत जाऊन गरजू लोकांच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम निर्माण होईल, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मार्श CSR च्या सहकार्याने आणि अपोलो हॉस्पिटल्सच्या वैद्यकीय कौशल्यामुळे या रुग्णवाहिका आपत्कालीन परिस्थिती आणि वेळेवर मिळणारी वैद्यकीय सेवा यातील महत्त्वाची दरी भरून काढण्यास मदत करतील.”
अपोलो हॉस्पिटल्स चे इमर्जन्सी विभागाचे रिजनल डायरेक्टर डॉ. नितीन जगसिया यांनी “आपत्कालीन परिस्थितीत प्री-हॉस्पिटल केअरचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, आपत्कालीन सेवा रुग्ण रुग्णालयात पोहोचल्यावर सुरू होत नाही, तर मदतीसाठीचा फोन केला जातो त्या क्षणापासून सुरू होते. या रुग्णवाहिका एका स्वतंत्र हॉस्पिटल प्रमाणे सज्ज असून, आपत्कालीन परिस्थितीतील सुरुवातीच्या अत्यंत महत्त्वाच्या मिनिटांमध्ये तज्ज्ञ वैद्यकीय सेवा देण्यासाठी त्यांची रचना करण्यात आली आहे. या भागीदारीमुळे संपूर्ण तातडीच्या आरोग्यसेवा अधिक मजबूत होऊन गंभीर उपचार रुग्णांच्या अधिक जवळ पोहोचविणे शक्य होणार आहे.” असे सांगितले.
आरोग्याविषयी जोखमीच्या वेळी यूरोपियन देशांप्रमाणेच तातडीच्या आरोग्यसेवा आता नाशिकरांच्या सेवेत रुजू झालेल्या आहेत 1066 ह्या क्रमांकावर हि सेवा २४ X ७ उपलब्ध आहे असे सांगितले, ह्यावेळी अपोलो हॉस्पिटल्सचे वेस्टर्न रिजिनल हेड श्री. अरुणेश पुनिथा, मेंदूविकार तज्ञ डॉ. संजय वेखंडे डॉ. एम.एस डॉ. ह्रिषीकेश कर्पे इमर्जन्सी विभागाचे डॉ. प्रसाद रौंदळ, मार्केटिंग हेड श्री.देवेंद्र वाघ उपस्थित होते.
![]()


