नाशिक: मुंबई नाक्यावर देहविक्रीचा अड्डा उद्ध्वस्त; एकाला अटक, महिलेची सुटका

नाशिक। दि. २० ऑगस्ट २०२६: मुंबई नाका परिसरातील एका भाड्याच्या बंगल्यात सुरू असलेल्या कथित देहविक्रीच्या व्यवसायाचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पर्दाफाश केला. पोलिसांनी छापा टाकून एका महिलेची सुटका केली असून, या प्रकरणातील एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. तर त्याचा साथीदार पोलिसांच्या कारवाईची चाहूल लागताच फरार झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पर्यावरणपुरक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी घनकचऱ्याचे व्यवस्थापन करावे- मंत्री पंकजा मुंडे

मुंबई नाका परिसरातील एका बंगल्यात देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने साध्या वेशात सापळा रचून संबंधित ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत कृष्णकुमार सीताराम यादव (२६, रा. कुटे मार्ग) आणि संजय विजय शर्मा (रा. अशोका मार्ग) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  महासिंहस्थासाठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत बचावकार्याची ‘मॉन्सून टेस्ट’; आनंदवल्ली घाटावर तात्पुरत्या सुविधांची चाचणी

गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वास चव्हाणके, पोलिस उपनिरीक्षक सुवर्णा महाजन यांच्यासह शेरखान पठाण, गणेश वाघ, प्रजित ठाकूर, वैशाली घरटे, लीला सुकटे आदींच्या पथकाने पंच आणि सामाजिक संस्थेच्या स्वयंसेवकांच्या उपस्थितीत बंगल्यावर छापा टाकला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीमेत 79.82 टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण

कारवाईदरम्यान बंगल्याबाहेर फिटनेस क्लबचा फलक लावण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात संबंधित संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार संशयिताचा शोध सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790