नाशिक: विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमासाठी मतदारांनी १७ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरावेत

नाशिक। दि. १३ ऑगस्ट २०२६: भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR-2026) कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील मतदारांचे गणना अर्ज (Enumeration Form) भरण्याची प्रक्रिया दि. ३० जून २०२६ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सुरू आहे. या प्रक्रियेस आता केवळ पाच दिवसांचा कालावधी शिल्लक असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी आपले गणना अर्ज आपल्या बीएलओमार्फत भरून द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या बैठकीस विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाने बनावट वर्कऑर्डर; तीन कोटींची फसवणूक उघड; दोघांना अटक

बैठकीत विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील सर्व १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. तालुकानिहाय सुरू असलेल्या कामाची माहिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आली. निफाड, दिंडोरी आणि इगतपुरी या मतदारसंघांमध्ये मतदारांचे गणना अर्ज भरणे तसेच डिजिटायझेशनचे काम १०० टक्के पूर्ण झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतदारसंख्या सर्वाधिक असून तेथील गणना अर्ज भरण्याचे काम ७३ टक्के पूर्ण झाले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेंतर्गत स्व-गणना पत्रक न भरलेल्या मतदारांनी 17 ऑगस्टपर्यंत भरावेत

जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिकच्या nashik.gov.in पोर्टलवर तसेच मतदार यादीसंदर्भातील अधिकृत माध्यमातून आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्याच्या रोजच्या माहिती अपडेटनुसार अनुपस्थित, स्थलांतरित, मृत व दुबार मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या संदर्भात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी तसेच त्यांनी नेमणूक केलेल्या केंद्रीय प्रतिनिधींनी याद्या डाऊनलोड करून मतदारांची पडताळणी करावी. या अनुषंगाने काही सूचना अथवा हरकती असल्यास संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहनही करण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक-नांदुरी रस्त्याच्या रुंदीकरण कामाची पाहणी; गुणवत्ता निकषांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक असे
• मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत गृहभेटी : ३० जून २०२६ ते १७ ऑगस्ट २०२६
• मतदान केंद्र सुसूत्रीकरण/पुनर्रचना : १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत
• मतदार यादीचा प्रारूप प्रसिद्धी : २४ ऑगस्ट २०२६
• दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी : २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६
• नोटीस कालावधी / दावे व हरकती निकाली काढणे : २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०२६
• मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी : २७ ऑक्टोबर २०२६

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790