नाशिक पूर्व मतदारसंघातील मतदारांनी ८ व ९ ऑगस्टच्या विशेष शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन

नाशिक। दि. ७ ऑगस्ट २०२६: भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमअंतर्गत १२३ नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाचे काम सुरू आहे. त्यानुषंगाने या कार्यक्रमांतर्गत मतदारसंघात अद्याप फॉर्म न भरलेले मतदार आढळून आले आहेत. अशा सर्व मतदारांनी ८ व ९ ऑगस्टच्या विशेष शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन १२३ नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे उपजिल्हाधिकारी (प्रशासन) तथा मतदार नोंदणी अधिकारी कुंदन हिरे यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकला आज (दि. ६) पावसाचा 'यलो अलर्ट'; घाटमाथ्यावर जोरदार सरींचा अंदाज

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत मतदारांचे फॉर्म भरून त्यांचे डिजिटायझेशन करण्याचे काम जिल्ह्यात वेगाने सुरू आहे. १२३ नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात एकूण ४ लाख १६ हजार ४०९ मतदार असून, त्यापैकी ३ लाख ३७ हजार ६६३ मतदारांचे फॉर्म आतापर्यंत डिजिटायझेशन करण्यात आले आहेत. मात्र ७८ हजार ७४६ मतदारांचे फॉर्म अद्याप डिजिटायझेशन झालेले नाहीत. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी केलेल्या सर्वेक्षणात ASD (Absent, Shifted, Dead – अनुपस्थित, स्थलांतरित, मृत), Mark Uncollectible प्राप्त न झालेले मतदार आढळून आले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  SIR: नाशिककरांनो लक्ष द्या... मतदार गणना अर्ज भरण्याची मुदत 'या' तारखेपर्यंत वाढली !

या शिबिरांमध्ये संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) उपस्थित राहून मतदारांचे फॉर्म स्वीकारणार असून, आवश्यक मार्गदर्शनही करणार आहेत. मतदारांनी आपल्या नावाची मतदार यादीतील नोंद अद्ययावत ठेवण्यासाठी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा आणि आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म भरून प्रक्रिया पूर्ण करावी, असेही आवाहन १२३ नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे उपजिल्हाधिकारी (प्रशासन) तथा मतदार नोंदणी अधिकारी श्री. हिरे यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790