Amazon

नाशिक तहसील कार्यालयातर्फे जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव

नाशिक। दि. १ ऑगस्ट २०२६ (जिल्हा माहिती कार्यालय): नाशिक तालुक्यातील गौण खनिज पथकाने गौण खनिजाची अवैधरित्या वाहतूक करीत असताना जप्त केलेल्या वाहन मालकांविरुद्ध दंडात्मक कार्यवाहीचे आदेश तहसील कार्यालयाने दिले आहेत. मात्र, वाहन मालकाने दंडात्मक कार्यवाहीच्या आदेशातील रक्कम शासन जमा केलेली नाही.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप; २५ हजारांचा दंड

त्यामुळे जप्त केलेल्या दोन वाहनांचा 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय, नाशिक येथे लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी अधिक माहितीसाठी तहसील कार्यालय, नाशिक येथे संपर्क साधावा, असे तहसीलदार पंकजकुमार पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

अंकुश केशव गवई, रा.विल्होळी, ता.जि.नाशिक मूळ मालक दामोधर हेमंत सोनवणे, रा.निगडोळ, ता.दिंडोरी, जि.नाशिक यांचा 407 टेम्पो (हाफ बॉडी ट्रक) क्रमांक एम.एच.-15, अे.जी. 7014 याची थकबाकी रक्कम रूपये 1 लाख 18 हजार 633 असून सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक यांनी या वाहनाचे मूल्य 71 हजार 250 रुपये निश्चित केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘महाराष्ट्राची लोकधारा’ कार्यक्रमाचे आज (दि. २२) आयोजन; विनामूल्य प्रवेश

तसेच एकनाथ रंगनाथ खंदारे, रा. घर नं 3, खांडेमळा, सिडको, हिरे स्कूल समोर यांचा हाफ बॉडी ट्रक क्रमांक एम.एच. 42/ बी-9051 याची थकबाकी रक्कम रूपये 2 लाख 87 हजार 256 असून सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक यांनी या वाहनाचे मूल्य 1 लाख 95 हजार रुपये निश्चित केले आहे. लिलावाबाबत अधिक माहितीसाठी तहसील कार्यालय नाशिक येथे संपर्क साधावा.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790