नाशिक। १७ जुलै २०२६: इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या हल्ला प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य तीन संशयितांना मुंढेगाव शिवारातून अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये राहुल भोरू भागडे (वय २६), आकाश चंद्रकांत भोईर (वय २७) आणि कैलास अशोक भागडे (वय २८, सर्व रा. नांदगाव सदो) यांचा समावेश आहे. यापैकी राहुल भागडे आणि आकाश भोईर हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरोधात यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणात याआधीच नऊ संशयितांना अटक करण्यात आली असून, नव्याने झालेल्या या कारवाईमुळे अटक झालेल्या आरोपींची संख्या वाढली आहे.
रविवारी नाशिक शहरातील एक कुटुंब भावली धरण परिसरात पर्यटनासाठी गेले असताना किरकोळ वादातून काही जणांनी त्यांच्या वाहनाची तोडफोड केली. त्यानंतर कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सुरुवातीला अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपासानंतर प्रकरण इगतपुरी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून, ग्रामीण पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
![]()


